ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेहीचे रुग्ण खजूर खाताना अनेकदा विचार करतात. परंतु, मधुमेहात खजूर खावे की नाही? जाणून घ्या.
खजूर खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. परंतु हे गोड असल्यामुळे मधुमेहाचे रुग्ण हे खाणं टाळतात.
खजूरमध्ये साखर असते, पण यात फायबर देखील असते. फायबरमुळे मधुमेही रुग्ण खजूर खाऊ शकतात.
खजूराचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो. म्हणजेच खजूर रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते.
मधुमेहींसाठी खजूर खाणे सुरक्षित आहे, परंतु ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे. जास्त खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.
मधुमेहाच्या रुग्णाने दिवसातून 2-3 वेळा खजूर खावेत. परंतु याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.