Dhanshri Shintre
डायबिटीज रुग्णांनी त्यांच्या नाश्त्यात हे पौष्टिक पदार्थ जरूर समाविष्ट करावेत, आरोग्य नियंत्रणासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतील.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालक, मेथी, ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांचा समृद्ध स्त्रोत आहे.
या भाज्यांमध्ये कार्बनहायड्रेट्स कमी आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असून, ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करतात.
डायबिटीज रुग्णांसाठी ओट्स एक आदर्श नाश्ता आहे, कारण तो निरोगी आणि स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतो.
ओट्समध्ये असलेल्या कॉम्प्लेक्स कार्बनहायड्रेट्समुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते, त्यामुळे अचानक वाढीला अडथळा येतो.
अंडी प्रथिनांचे उत्तम स्रोत असून, त्यात कमी कार्बनहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात.
अंडी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अस्वास्थ्यकर स्नॅक्सची इच्छा कमी होते आणि संतुलित आहार ठेवता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.