ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एखाद्याला मधुमेह झाला असेल तर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु,औषधाने आणि योग्य आहाराने मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मधुमेही रुग्णांनी सकाळी कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
आजच्या धावपळीच्या जीवनामुळे जर तुम्ही सकाळी नाश्ता करणे टाळत असाल तर या चुकीच्या सवयीमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
नाश्त्यामध्ये प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड आणि पांढरे ब्रेड खाणं टाळा, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
मधुमेही रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.
नाश्ता नेहमी योग्य वेळेत घ्यावा. चुकीच्या वेळी नाश्ता केल्याने ब्लड शुगर लेव्हलमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान नाश्ता करा.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम १ ते २ ग्लास पाणी प्या. रात्री झोपेत आपले शरीर डिहायड्रेटेड होते यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते.