Manasvi Choudhary
लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे. गणेशोत्सव म्हटलं की सर्वातआधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मोदकाचं नैवेद्य.
गणपतीच्या 5 दिवसांमध्ये नैवेद्यामध्ये मोदक असतात. तळलेले, उकडीचे, गव्हाचे आणि तांदळाचे असे मोदकाचे विविध प्रकार आहेत.
पण डायबिटीजच्या रूग्णांनी मोदक खावे का? मोदक खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काही परिणाम होतो का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
उकडीचे मोदक हे मैदा, तांदळाच्या पिठापासून बनवले जातात. या मोदकांमध्ये जे सारण असते त्यात गूळ किंवा साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
डायबिटीजचे रूग्ण गव्हाच्या पिठाचे मोदक खाऊ शकतात.
मोदक बनवताना सारणमध्ये साखर किंवा गूळ वापरण्याऐवजी खजूर , अजीर यांचा वापर करा.
मोदक बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाऐवजी नाचणीचे पीठ, ओट्सचे पीठ किंवा बाजरीचे पीठ वापरा.
मधुमेहाच्या रुग्णांनी सणाच्या दिवशी प्रसाद म्हणून एक-दोन मोदक खाणे योग्य मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.