Shreya Maskar
रक्तातील साखरेची पातळी कमी होणे (हायपोग्लायसेमिया) हा मधुमेहाचा एक सामान्य आणि महत्त्वाचा भाग आहे. हे प्रामुख्याने इन्सुलिन कमी झाल्यामुळे उद्भवते.
मेंदू इंधनासाठी पूर्णपणे ग्लुकोजवर अवलंबून असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी झाल्यास त्याला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
रक्तातील साखरेची पातळी सौम्य ते मध्यम प्रमाणात कमी झाल्यास चक्कर येणे, थरथरणे, गोंधळ उडणे आणि अंधुक दिसणे अशी लक्षणे जाणवतात. वेळीच उपचार न केल्यास, रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी झाल्यास झटके येणे, बेशुद्ध होणे कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
लो ब्लड शुगर झाल्यास सुरुवातीला थंडी वाजणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृती अधिक गंभीर होते.
धोक्यात रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी झाल्यामुळे एड्रेनालाईनसारख्या तणाव संप्रेरकांमध्ये वाढ होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.हृदय आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतो.
गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन घेणे तसेच जेवण न करता औषधे घेतल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे औषधांच्या वेळा आणि प्रमाण यांकडे विशेष लक्ष द्या.
अनियोजित किंवा दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक हालचालींमुळे ग्लुकोजची पातळी कमी होते. त्यात रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने शरीराला धोका निर्माण होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.