ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह हा अतिशय गंभीर आजार आहे. याचा शरीराच्या अनेक भागावर परिणाम होऊ शकतो. तसेच मधुमेहामुळे स्कीन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
तसेच मधुमेहामुळे स्कीन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. हे इन्फेक्शन कधीकधी गंभीर असू शकते. जो पर्यंत डायबिटीज कंट्रोल होत नाही, तो पर्यंत जखम बरी होत नाही.
हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे पायाकडे रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. ज्यामुळे पायाला इन्फेक्शनचा धोका वाढतो.
तसेच चेहऱ्यावर आणि मानेवर फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण सतत जास्त राहिल्यास हाताला इन्फेक्शनचा धोका वाढतो.
डायबिटीजचा परिणाम केसावरही होतो. तसेच यामुळे स्कॅल्पवर फंगल इन्फेक्शन होऊ शकतो.
हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे डोळ्यांच्याभोवती बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.