ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्कीन कॅन्सर हे एक गंभीर आजार आहे. यामध्ये त्वचेच्या पेशी असामान्यपणे वाढतात.
स्कीन कॅन्सर हे सूर्यप्रकाशातून निघणाऱ्या यूवी रेज म्हणजेच अल्ट्राव्हाईलेट किरणांमुळे होते. तसेच प्रदूषण आणि जास्त केमिकल वाले कॉसमेटिक्स वापरल्याने देखील होते.
स्कीन कॅन्सर होण्याआधी शरीर आपल्याया काही संकेत देते, यांना अजिबात दुर्लक्ष करु नका. ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.
त्वचेवर अचानक गाठ येणे. किंवा गाठीचा रंग वेळोवळी गडद होणे हे देखील स्कीन कॅन्सरचे लक्षण आहे.
त्वचेवर सतत खाज सुटणे, जळजळ होणे किंवा वेदना होणे हे देखील स्कीन कॅन्सर म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
त्वचेवर लाल मस्से येणे हे देखील स्कीन कॅन्सरचे लक्षण असू शकते.
शरीरावर झालेल्या कोणत्याही जखमेला बराच वेळ लागत असेल. तर हे त्वचेच्या कर्करोगाचे गंभीर लक्षण असू शकते.