Diabetes-High BP : मधुमेह अन् बीपी कंट्रोल करतील 'हे' ५ सुपरफूड, वजनही होईल झटपट कमी

Shreya Maskar

पालक

पालक या पालेभाजीत व्हिटॅमिन ई, सी आणि के तसेच लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला रोग प्रतिकारशक्ती देतात. पालकमधील फायबर आणि पाण्याचे प्रमाण वजन कमी करण्यास मदत करते. तसेच त्यात आढळणारे नैसर्गिक नायट्रेट (Nitrate) हे संयुग रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

Spinach | pinterest

हाय बीपी

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. पालकमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूप कमी असतो, त्यामुळे पालकाचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.

High BP | pinterest

हिरवे मूग

तुमच्या आहारात हिरव्या मुगाचा समावेश करा. ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचे हृदयरोगापासून संरक्षण होते.

Green Gram | pinterest

साखरेची पातळी

हिरवे मूगमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते. शिवाय, त्यातील उच्च फायबरचे प्रमाण वजन कमी करण्यास मदत करते.

Blood Sugar Levels | pinterest

ओट्स

ओट्समध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे, लोह आणि फायबर हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विद्राव्य फायबर असते, जे खराब कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी कमी करते. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

Oats | pinterest

नाचणी

नाचणी मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबरचा चांगला स्रोत आहे. नाचणी उच्च रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात, जे मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. त्यातील फायबरचे प्रमाण वजन कमी करण्यास मदत करते.

Nachani | pinterest

बदाम

बदामामध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Almonds | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : वेळीच व्हा सावध! रोजच्या 'या' चुकांमुळे हळूहळू वाढतंय तुमचं BP

High Blood Pressure | saam tv
येथे क्लिक करा...