Healthy Milk For Diabetics: डायबिटीजच्या रुग्णांनी दुधामध्ये मिसळून प्या 3 गोष्टी, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात!

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजच्या रूग्णांनी रक्तातील साखर वाढू नये म्हणून आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Diabetes | pinterest

हेल्दी ड्रिंक

दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत असले, तरी डायबिटीजच्या रुग्णांनी साधे दूध पिण्याऐवजी त्यामध्ये काही विशिष्ट पौष्टिक घटक मिसळून प्यायल्यास फायदा होईल.

Milk | pinterest

दुधामध्ये मिक्स करून प्या 3 गोष्टी

रक्तातील साखर वाढू नये म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी दुधामध्ये कोणत्या ३ गोष्टी मिसळून प्याव्यात ते जाणून घ्या.

Spices | yandex

दालचिनी पावडर

दुधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिक्स करून प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते. दालचिनीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटीन आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त ठरतात.

Cinnamon Powder

हळद

हळदीचे दूध हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते आणि डायबिटीजचे रुग्णही साखर न घालता याचे सेवन करू शकतात. हळदीमध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि मधुमेह रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

turmeric milk. | pinterest

बदाम

भिजवून सोललेल्या बदामाची पेस्ट किंवा बदामाची पावडर दुधात मिसळून पिणे अत्यंत पौष्टिक ठरते. बदामाच्या दुधामध्ये पोटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, आयर्न, फायबर आणि कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात. यातील फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि शरीराला आवश्यक ऊर्जा व पोषणतत्त्वे मिळतात.

Almond Milk | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Morning Tips For Women: महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नयेत: घरात सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

morning tips for women | Saam TV
येथे क्लिक करा...