डायबिटीज होईल बरा! रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरडाळीचे करा सेवन

Manasvi Choudhary

मधुमेह

देशभरात मधुमेह या आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त वयोवृद्धांना नाहीतर तरूणांना देखील मधुमेहाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Diabetes Causes | saam tv

रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी आहारात करा बदल

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह होतो. या आजाराला पूर्णपणे मुळापासून बरे करणे कठीण असले, तरी तुमच्या रोजच्या आहारामध्ये बदल केल्यास यावर सहज नियंत्रण मिळवता येते

Blood Sugar Control Foods

तुरडाळीचा कसा होतो फायदा

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी 'तूरडाळ' डाळीचे तुम्ही सेवन करू शकता. तुरडाळीच्या सेवनाने नेमका काय फायदा होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Toor Dal Benefits

पोषक तत्वांचा खजिना

तूरडाळीमध्ये प्रथिने , लोह , कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची पोषणतत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऊर्जा देतात

Rich in Essential Nutrients

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

तूरडाळीचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो. त्यामुळे या डाळीचे सेवन केल्यावर शरीरात कर्बोदके हळूहळू पचतात आणि रक्तामध्ये साखर एकदम न वाढता नियंत्रित राहण्यास मदत होते.

Regulates Blood Sugar

पचनासाठी हलकी

अनेक डाळींमुळे गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो, मात्र तूरडाळ पचायला अत्यंत हलकी असते. तुरडाळीच्या सेवनामुळे पचनाच्या समस्या कमी होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Easy to Digest

फायबरचा उत्तम स्त्रोत आणि वजन नियंत्रण

तूरडाळीमध्ये फायबरचेप्रमाण जास्त असते यामुळे डाळ खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळपर्यंत पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही वजन कमी करण्यासही मदत होते.

High Fiber & Weight Management

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: हायवेवर दिसणाऱ्या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषांचा अर्थ माहितीये का?

येथे क्लिक करा...