Manasvi Choudhary
डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे.
डायबिटीज असणाऱ्यांनी कोणत्या भाज्या, फळे खाव्यात हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
फायबरयुक्त पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात.
वैद्यकिय सल्ल्यानुसार, दररोज फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने टाईप २ मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदय निरोगी राहते.
ब्रोकोलीमध्ये असे घटक असतात जे रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत. ब्रोकोली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
बेरी हे साखर कमी आणि उच्च फायबरयुक्त फळ आहे ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
किवी हे पोषणदायी फळ आहे. किवीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते.
भेंडी डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात भेंडीमध्ये सोल्युबल फायबर्स जास्त प्रमाणात असतात जे रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत.
डायबिटीज रामबाण उपाय म्हणून कारल्याची भाजीचे सेवन केले जाते. कारल्याचा रस नियमितपणे प्यायल्याने डायबिटीजची समस्या दूर होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला.