Diabetes : मधुमेही रुग्णांसाठी 'शुगर फ्री' पदार्थही घातक, शरीरावर होणारे परिणाम एकदा वाचाच, आजपासूनच खाणे सोडाल

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेले रुग्ण साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र जास्त प्रमाणात शुगर फ्री पदार्थ खाणे देखील आरोग्यास घातक ठरते.

Diabetes | pinterest

कर्बोदके अन् कॅलरीज

शुगर फ्री पदार्थांमध्ये देखील कर्बोदके अन् कॅलरीज असतात. साखरेला पर्याय असलेले पदार्थ (मध, खजूर, गूळ) ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.

Carbohydrates and calories | pinterest

पचन समस्या

अनेक शुगर फ्री पदार्थांमध्ये सॉर्बिटॉल, मॅनिटॉल किंवा माल्टिटॉलसारख्या शुगर अल्कोहोलचा वापर केला जातो. यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने अनेकदा पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारख्या पचनसंस्थेच्या समस्य उद्भवू शकतात.

Digestion | pinterest

इन्सुलिन

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शुगर फ्री पदार्थांवर जास्त अवलंबून राहिल्याने दीर्घकालीन ग्लुकोज चयापचय आणि इन्सुलिन प्रतिसादात अडथळा येऊ शकतो.

insulin | pinterest

आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम

शुगर फ्री पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडू शकते, जे रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Effects on gut health | pinterest

गोड खाण्याची तीव्र इच्छा वाढते

शुगर फ्री पदार्थांचे जास्त सेवन केल्यास तुमचा मेंदू वारंवार गोड खाण्याची इच्छा व्यक्त करतो. ज्यामुळे वजन देखील वाढते. सतत डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो.

Strong desire to eat sweets increases | pinterest

वजन वाढते

शुगर फ्री पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास वजन देखील वाढते. कृत्रिम गोडव्यामुळे शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे गोड खाण्याची लालसा वाढते आणि परिणामी वजन वाढू शकते.

Weight increases | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांना पावसाळ्यात 'या' ५ आजारांचा धोका, वेळीच सतर्क व्हा

Diabetes | saam tv
येथे क्लिक करा...