Shreya Maskar
मधुमेही व्यक्तींना झालेल्या जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण, मज्जातंतूंचे नुकसान ज्यामुळे जखमा लपतात, रक्ताभिसरणाचा अभाव ज्यामुळे पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती जी जंतूंशी लढण्यास असमर्थ ठरते आणि रक्तातील साखरेचे उच्च प्रमाण, ज्यामुळे शरीर नवीन ऊती तयार करू शकत नाही.
रक्तातील साखरेची पातळी योग्य मर्यादेत ठेवणे ही सर्वात महत्त्वाचे आहे. ज्यामुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
धूळ आणि जंतू काढून टाकण्यासाठी सौम्य साबण आणि स्वच्छ पाण्याने दररोज जखम धुवावी. तसेच ती जागा कायम कोरडी आणि मऊ राहील याची काळजी घ्या.
डॉक्टरांकडून आल्यावर वेळोवेळी घरी देखील जखमेला ड्रेसिंग करा. जखम ओलसर ठेवण्यासाठी आणि जिवाणूंना रोखण्यासाठी प्रगत बँडेजेसचा वापर करा.
जर जखमेवर संसर्गाची लक्षणे (लालसरपणा किंवा सूज) दिसली, तर जिवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली अँटीबायोटिक्स घ्यावीत.
जखमेवर पडणारा सर्व प्रकारचा दाब आणि वजन काढून टाका किंवा कमी करा. यासाठी तुम्ही कुबड्या वापर करा. तसेच या काळात जास्त गोड पदार्थांचे सेवन टाळा.
शरीरातील खराब झालेल्या उतींची दुरुस्ती होण्यास मदत व्हावी म्हणून 'लीन प्रोटीन' (उदा. मासे, अंडी आणि चिकन) आणि जीवनसत्त्वे (vitamins) यांचा समावेश असलेला आहार घ्यावा. तसेच तुम्ही हलका व्यायाम देखील करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.