Shreya Maskar
उच्च-कॅलरी, तळलेले आणि साखरयुक्त रस्त्यावरील खाद्यपदार्थांची लालसा यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील ग्लुकोजमध्ये झपाट्याने वाढ होते, यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.
पावसाळ्यातील अस्वच्छ, दूषित पाण्यातून चालणे बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढवते, ज्यामुळे रक्तातील साखरेचा संसर्ग होतो. पावसाळ्यात पाय ओले ठेवू नये. मोज्यांसह साचलेल्या पावसाच्या पाण्यात चालल्याने बुरशीजन्य संसर्ग होतो.
पावसाळ्यात मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी आवर्जून नियमित ग्लुकोज मॉनिटरिंग करावे. ज्यामुळे अचानक कोणतीही समस्या उद्भवत नाही.
मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे (न्यूरोपॅथी) पायाला झालेल्या जखमा जाणवणे कठीण होते. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे जखमा लवकर भरत नाहीत, ज्यामुळे अल्सरचा धोका वाढतो.
पावसाचे निमित्त करून रोजचा व्यायाम थांबवल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि रक्तातील साखर वाढते.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू किंवा टायफॉइडचा धोका वाढतो. प्रक्रिया न केलेले पाणी प्यायल्याने हे आजार उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात उकळलेले पाणी प्या. दूषित पाण्यामुळे ज्यामुळे चयापचयावर गंभीर ताण येतो आणि रक्तातील साखरेची पातळी अनियमित होते.
बाहेरून आणलेली फळे दूषित असू शकतात आणि पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे उघड्या पृष्ठभागांवर जीवाणू वेगाने वाढतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.