Diabetes : मधुमेही रुग्णांना सतत काहीतरी खावेसे वाटते? करा 'हे' ५ रामबाण उपाय, साखर राहील नियंत्रणात अन् वारंवार भूकही लागणार नाही

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेही रुग्णांना वारंवार भूक लागते, याला वैज्ञानिक भाषेत 'पॉलिफेजिया' असे म्हणतात. या रुग्णांना अन्नाचे रुपांतर ऊर्जेत करताना अडचण येते. रक्तामध्ये भरपूर साखर असूनही, प्रभावी इन्सुलिनच्या अभावामुळे ही ऊर्जा पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी, शरीरात अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यासारखे त्यांना वाटते आणि वारंवार भूक लागल्यासारखे होते.

Diabetes | pinterest

फायबरचे पदार्थ खा

कमी चरबीयुक्त प्रथिने आणि उच्च फायबरयुक्त पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि तुमचे शरीर जास्त काळ भरलेले राहते. हे पदार्थ शरीराला भरपूर ऊर्जा देतात.

Eat fiber foods | pinterest

रक्तातील साखरेची पातळी

सतत भूक लागणे हे रक्तातील साखर जास्त किंवा कमी झाल्यामुळे होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी. कंटीन्युअस ग्लुकोज मॉनिटर वापरल्याने तुम्हाला रिअल-टाइम ट्रेंड्स समजण्यास मदत होईल.

Blood sugar levels | pinterest

औषधे

जर तुम्हाला वारंवार रक्तातील साखर कमी होण्याचा (हायपोग्लायसेमिया) त्रास होत असेल, तर त्यामुळे तीव्र भूक लागू शकते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. यामुळे तुमच्या इन्सुलिन किंवा मधुमेहाच्या औषधांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का हे कळेल.

Medicines | pinterest

जेवणाचे वेळापत्रक

जेवण टाळल्याने किंवा चुकीच्या वेळी जेवल्याने अनेकदा रक्तातील साखर झपाट्याने कमी होते आणि त्यानंतर जास्त खाल्ले जाते. दिवसभर ठराविक अंतराने संतुलित जेवण केल्याने शरीरातील ऊर्जा कायम राहते.

Meal schedule | pinterest

पाणी प्या

दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने पोट भरण्यास मदत होते, शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकले जाते आणि खाण्याची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी हा एक सोपा नैसर्गिक उपाय आहे.

drink water | pinterest

गोड पदार्थ टाळा

मधुमेही रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळा. कारण गोड पदार्थांमुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.

Avoid sweet foods | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांचेही झटपट वजन होईल कमी, फक्त फॉलो करा 'या' ५ सीक्रेट टिप्स

Diabetes-Weight Loss | saam tv
येथे क्लिक