Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात संसर्गामुळे रक्तातील साखरेची पातळी बदलू शकते. त्यामुळे ग्लुकोजची नियमित तपासणी करून आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शिळे, उघड्यावरचे किंवा दूषित अन्न टाळा. घरचे ताजे आणि संतुलित अन्न खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.
पावसाच्या पाण्यात चालणे टाळा. पाय भिजल्यास ते लगेच कोरडे करा आणि स्वच्छ मोजे व योग्य पादत्राणे वापरा. मधुमेहींमध्ये पायांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.
थंड वातावरणात तहान कमी लागली तरी शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छ किंवा उकळलेले पाणी प्या.
पाऊस असल्यामुळे व्यायाम टाळू नका. घरातच योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करून शरीर सक्रिय ठेवा.
डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार औषधे किंवा इन्सुलिन घ्या. औषधांमध्ये स्वतःहून कोणताही बदल करू नका.
पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. ताप, खोकला, त्वचेवरील संसर्ग किंवा पायाला झालेली जखम दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.