Diabetes -High BP : मधुमेहाच्या रुग्णांना हाय बीपीचाही त्रास आहे? लाइफस्टाइलमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, नाहीतर...

Shreya Maskar

मधुमेह-बीपी

रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा मधुमेहाचा धोका वाढतो. दीर्घकाळ मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच अनेक रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होतो.

Diabetes and Blood Pressure | pinterest

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब अनियंत्रित राहिल्यास हृदयाचे स्नायू जाड होतात. तीव्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदय निकामी होणे, मेंदूतील रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) आणि पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा धोका असतो.

High Blood Pressure | pinterest

जीवनशैली

तज्ञांच्या मते, ज्या लोकांची रक्तातील साखर आणि रक्तदाब अनियंत्रित आहे, त्यांनी आपल्या आहाराची आणि लाइफस्टाइलची विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा रुग्णांनी धूम्रपान, मद्यपान टाळावे. शिवाय तणाव देखील या दोन्ही समस्यांना कारणीभूत ठरतो.

Lifestyle | pinterest

तणावमुक्त जीवन

ध्यान (मेडिटेशन) तणाव नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या आवडीच्या कामांमध्ये व्यस्त राहणे किंवा संगीत ऐकणे तणावाची पातळी नियंत्रणात ठेवते.

Stress-Free Life | pinterest

वजन नियंत्रणात ठेवा

लठ्ठपणामुळे दोन्ही प्रकारच्या आरोग्य समस्यांचा गंभीर धोका निर्माण होतो, त्यामुळे वजनाचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम करा आणि तेलकट, जास्त कॅलरीजचे पदार्थ खाणे टाळा.

Keep Your Weight Under Control | pinterest

कोणते पदार्थ खाऊ नये?

अति गोड किंवा खारट पदार्थ टाळा. तळलेले पदार्थ, लाल मांस, भात, मैदा, ब्रेड आणि पास्ता यांसारखे पदार्थ देखील बीपी आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी घातक आहेत.

Which Foods Should You Avoid? | pinterest

नियमित तपासणी करा

तुमचा आहार, व्यायाम आणि औषधे यांचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी रक्तदाब आणि डायबिटीज तपासा.

Undergo Regular Check-ups | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT :  रक्तातील शुगर अचानक वाढणार नाही, साखरेला पर्याय म्हणून वापरा 'हे' ५ पदार्थ

Diabetes | saam tv
येथे क्लिक करा...