Shreya Maskar
शेवग्याच्या पानांचा चहाला मोरिंगा चहा असेही म्हणतात. शेवग्याची पानांमध्ये भरपूर प्रथिने, जीवनसत्त्वे (अ, क, ई) आणि कॅल्शियम असतात. यांचे प्रमाणात सेवन करा.
मोरिंगा चहा बनवण्यासाठी पाणी, शेवग्याची पाने, आले, लिंबाचा रस, मध इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
मोरिंगा चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात शेवग्याची पाने आणि आले घाला. मंद आचेवर ५-६ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर चहा गाळून घ्या.थोडे थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घाला. यानंतर, मध घाला, चांगले मिसळा आणि हळूहळू प्या.
मोरिंगा चहा रिकाम्या पोटी प्यावा. हा चहा सकाळी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.
मोरिंगा चहा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.ती रक्तातील साखरेच्या नियंत्रणास मदत करते. शरीराला साखर अधिक चांगल्या प्रकारे पचवण्यास आणि जेवणानंतर ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.
मोरिंगा चहा ॲसिडीटीवर फायदेशीर ठरतो. तो आतड्यांच्या अस्तराला आराम देण्यास आणि पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करतो, परंतु त्याचे अतिसेवन केल्यास पोट बिघडू शकते. पचनक्रिया देखील सुधारते.
मोरिंगा चहामधील घटक शरीराची सूज करण्यास मदत करते. तसेच ऊतींचा दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.