Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो 'धुरंधर' मुळे चांगला चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांचे यादी जाणून घेऊयात.
धुरंधरच्या क्लायमॅक्समध्ये अक्षय खन्नाच्या पात्राचा शेवट झाला असला तरी 'धुरंधर 2' मध्ये अक्षय फ्लॅशबॅक दृश्यांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. 'धुरंधर 2' मार्च 2026 ला रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे.
'महाकाली' चित्रपटात अक्षय खन्ना असुरगुरू शुक्राचार्यची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक पोस्टर आधीच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2026ला येणार आहे.
इक्का चित्रपटात अक्षय खन्ना सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. हा ॲक्शन थ्रिलर सिनेमा आहे. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल.
अजय देवगणच्या 'दृश्यम ३'मध्ये देखील अक्षय खन्ना झळकणार आहे. 'दृश्यम २'मधील अक्षय खन्नाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.
वरील चार चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय खन्नाचे नाव आणखी एका प्रकल्पांसाठी चर्चेत आहे. तो म्हणजे सेक्शन 84 सिनेमा. 'सेक्शन 84' हा कोर्ट रूम थ्रिलर फिल्म आहे.
2025 मध्ये अक्षय खन्नाचा 'छावा' चित्रपट खूप गाजला. 'छावा'मध्ये अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्याच्या प्रभावी अभिनय चाहत्यांना खूप पसंतीस पडला.
अक्षय खन्नाची खलनायकाची पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे. त्याचा रुबाब आणि अंदाज प्रेक्षकांना कनेक्ट करतो.