Shreya Maskar
'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
'धुरंधर' चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. हा रेकॉर्ड अक्षय खन्नाने केलेल्या FA9LA गाण्यातील डान्स संबंधित आहे. त्याची हुक स्टेप जगभरात तुफान व्हायरल होत आहे.
'धुरंधर' चित्रपटातील FA9LA हे गाणे बिलबोर्ड अरेबिया चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. ज्यामुळे त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मान मिळवला आहे.
FA9LA या गाण्यामुळे बहरीनी रॅपर फ्लिपाराचीचे नाव देखील चर्चेत आले आहे. FA9LA हे गाणे धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या एन्ट्रीसाठी दाखवण्यात आले होते. जे आजही सोशल मीडियावर चांगले गाजत आहे.
'धुरंधर' चित्रपट सध्या ओटीटी गाजवताना दिसत आहे. 'धुरंधर' चाहत्यांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळत आहे. तेथे देखील चित्रपटाला खूप प्रतिसाद मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने जगभरात जवळपास 1,300 कोटी रुपये कमावले आहेत. धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे.
कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. या चित्रपटातील डायलॉग, गाणी, कलाकारांचा अभिनय सर्वांचे कौतुक होत आहे.
'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.