Dhokla Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल खमंग ढोकळा, वाचा ही सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य

बेसन, रवा (ऐच्छिक), दही, पाणी, हळद, मीठ, साखर, इनो किंवा फ्रूट सॉल्ट, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि तेल अशी ढोकळ्यासाठी आवश्यक सामग्री लागते.

Dhokla Recipe | Google

ढोकळ्याचे पीठ कसे तयार करावे

एका भांड्यात बेसन, दही, पाणी, मीठ, साखर आणि हळद एकत्र करून गुळगुळीत पीठ तयार करा. हे पीठ साधारण १०–१५ मिनिटे बाजूला ठेवा.

Dhokla Recipe | Yandex

ढोकळा फुलण्यासाठी इनोचा वापर

ढोकळा मऊ आणि फुललेला होण्यासाठी शेवटी इनो किंवा फ्रूट सॉल्ट घालून पीठ हलक्या हाताने मिसळावे. यामुळे ढोकळा छान स्पॉंजी बनतो.

Dhokla Recipe | Yandex

वाफेवर ढोकळा शिजवण्याची पद्धत

ताट किंवा साच्यात तेल लावून पीठ ओता. कुकर किंवा स्टीमरमध्ये १५–२० मिनिटे वाफेवर ढोकळा शिजवा.

Dhokla Recipe | Yandex

ढोकळ्याची फोडणी कशी द्यावी

कढईत तेल गरम करून मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी ढोकळ्यावर ओता.

Dhokla Recipe | Yandex

ढोकळा अधिक चविष्ट करण्यासाठी टिप्स

ढोकळ्यावर थोडे साखर-पाणी शिंपडल्यास तो ओलसर आणि चविष्ट लागतो. वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे घालू शकता.

Dhokla Recipe | Google

ढोकळा कशासोबत सर्व्ह करावा

ढोकळा हिरव्या चटणी, चिंचेच्या गोड चटणी किंवा दहीसोबत नाश्ता किंवा हलका आहार म्हणून सर्व्ह करता येतो.

Dhokla Recipe | Yandex

कान्स ते मेट गाला...; २०२५ मध्ये या भारतीय अभिनेत्री ठरल्या ग्लोबल फॅशन आयकॉन्स

Bollywood 2025
येथे क्लिक करा