Shreya Maskar
वीकेंडला पुण्याची ट्रिप प्लान करा. येथील ऐतिहासिक ठिकाणांना सुट्टीत आवर्जून भेट द्या. पुण्यात धवळगड / ढवळगड हा ऐतिहासिक किल्ला लपलेला आहे.
ढवळगड किंवा धवळगड हा १६ व्या शतकातील किल्ला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात आंबळे गावाजवळ आणि भुलेश्वर पर्वतरांगेत धवळगड वसलेला आहे.
किल्ल्याच्या माथ्यावर वसलेल्या प्राचीन धवलेश्वर शिवमंदिरासाठी धवलगड किल्ला ओळखला जातो. हा एक साधा-सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे.
धवलगड किल्ल्यावर ऐतिहासिक अवशेषांचे दर्शन घडते. यामध्ये बुरुज, 'चुनेचा घाणा' (चुना तयार करण्याचे साधन) आणि गणपतीची मूर्ती यांचा समावेश आहे.गडाच्या पूर्वेस काही तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत, जे पडक्या अवस्थेत आहेत.
ढवळगड किल्ला प्रामुख्याने शिवकाळात घाटमार्गावर आणि दिवेघाटावर गस्त ठेवण्यासाठी तसेच टेहाळणीसाठी वापरला जात असे. हा एक लहान पण महत्त्वाचा लष्करी दुर्ग आहे.
ढवळगड किल्ल्यावरून आसपासच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते. तुम्ही या ऐतिहासिक ठिकाणाला सुट्टीत नक्की भेट द्या. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पुण्यात सिंहगड, राजगड, शिवनेरी , तोरणा आणि लोहगड हे प्रसिद्ध किल्ले आहेत. जिथे तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.