Dhapate Recipe : आज नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत करा गावाकडे बनवतात तसे खुसखुशीत धपाटे

Shreya Maskar

नाश्ता

हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्याला झटपट धपाटे बनवा. मुलांच्या डब्यासाठी देखील हा पदार्थ उत्तम आहे.

Dhapate | yandex

धपाटे साहित्य

धपाटे बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, दही, पाणी, मीठ, हिंग, ओवा, धणे-जिरे पूड, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, तेल, पांढरे तीळ, कोथिंबीर, कांदा इत्यादी साहित्य लागते.

Dhapate | yandex

ज्वारीचे पीठ

धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन मिक्स करून घ्या. सर्व पीठ एकदा चाळून घ्या.

flour | yandex

लाल तिखट

त्यानंतर पिठात चवीनुसार मीठ, लाल तिखट , हिंग, हळद, धणे-जिरे पूड , तीळ घालून मिश्रण एकजीव करा. पीठाला सर्व मसाले लागतील याची काळजी घ्या.

Red chilli powder | yandex

कोथिंबीर

यात कोथिंबीर बारीक चिरून टाका. त्यानंतर हिरव्या मिरची, कांदा घालून पीठ एकजीव करा. हिरवी मिरची जास्त तिखट असणार नाही, याची काळजी घ्या.

Coriander | yandex

दही

त्यानंतर मिश्रणात दोन चमचे दही, तेल, पाणी टाकून पीठ मळून घ्या. दही तुमच्या आवडीनुसार टाका. जेणेकरून तुम्हाला पदार्थाची चव आवडेल.

Yogurt | yandex

धपाटे

पोळपाटावर ओला कपडा ठेवा आणि त्यावर पाणी लावा. त्यानंतर पीठाचे छोटे गोळे करून धपाटे थापून घ्या.

Dhapate | yandex

तेल टाका

तवा तापला की, त्यावर तेल टाका आणि धपाटे गोल्डन फ्राय करा. खमंग धपाटे च‌टणी किंवा दह्यासोबत खा.

Dhapate | yandex

NEXT : चटपटीत शेंगदाण्याचा ठेचा, भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा

Peanut Thecha Recipe | yandex
येथे क्लिक करा...