ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धनश्री काडगावकर ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
धनश्री खलनायिकेच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने तुझ्यात जीव रंगला आणि तू चाल पुढ या मालिकेत काम केले आहे.
धनश्री सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
धनश्रीने नुकतेच कॉटनच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
धनश्रीने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर पिंक कलरचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज घातला आहे.
धनश्रीने साडीवर छान कलरफुल नेकलेस घातला आहेत. हातात बांगड्या आणि कानात झुमके घातले आहेत.
धनश्री या सिंपल सोबर लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
धनश्रीने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.
धनश्री नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे डान्सचे, योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते.