ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ढाब्यासारखा मलाई कोफ्ता घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मलाई कोफ्ता नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. तुम्हालाही मलाई कोफ्ता खायचा असेल तर नक्की ट्राय करा.
मलाई कोप्ता बनवण्यासाठी पनीर, बटाटे, कोथिंबीर, जिरे, मीठ, मिरची, मैदा, टोमॅटो, मिरची, आलं- लसूण पेस्ट, हिंग, धना पावडर, हळद, क्रिम, हे साहित्य एकत्र करा.
कोफ्ता बनवण्यासाठी पनीर, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मीठ, मिरची हे सर्व मैदाच्या पिठात मिक्स करा.
यानंतर कढईत गरम तेलामध्ये तयार केले कोफ्ता तळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत कोफ्ता चांगले तळून घ्या.
कोफ्ता ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करा. मलई आणि पीठ एकत्र करा. त्यानंतर कढईत गरम तेलामध्ये हिंग, जिरे परतून घ्या.
संपूर्ण मिश्रणात टोमॅटो, धणे, हळद आणि तिखट मसाला घाला थोडावेळ मिश्रण शिजून द्या. नंतर या मिश्रणात मलई, मैदा आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रणात अंदाजाप्रमाणे पाणी घाला आणि शिजवून घ्या.
नंतर संपूर्ण मिश्रणात गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार कोफ्ता ग्रेव्हीमध्ये मिक्स करा.
छान शिजवून झाल्यानंतर मलाई कोफ्ता सर्व्हसाठी तयार असेल.