Manasvi Choudhary
रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेजी रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही ढाबा स्टाईल अंडा मसाला रेसिपी घरी बनवा.
अंडा मसाला घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तु्म्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने अंडा मसाला बनवू शकता.
अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी, कांदा, टोमॅटो, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मसाला, हळद, धना पावडर, दही, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.
अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर गरम पाण्यामध्ये अंडी उकडून घ्यायची आहे. उकडलेली अंडी एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये लवंग, वेलची आणि दालचिनी छान परतून घ्या यानंतर यात बारीक कापलेला कांदा परतून घ्या. संपूर्ण मिश्रणात नंतर आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा.
मिश्रण थोडे शिजल्यानंतर यात टोमॅटो पेस्ट, लाल मसाला, हळद, धना पावडर आणि गरम मसाला मिक्स करा. आवश्यकतेनुसार तुम्ही या मिश्रणात दही देखील घालू शकता.
या मसाल्यामध्ये थोडेसे पाणी घालून भाजीला छान उकळी आणा अशाप्रकारे अंडा मसाला तयार होईल.
तयार अंडा मसालामध्ये उकडलेली अंडी मिक्स करून मिश्रण एकजीव करा. अशाप्रकारे ढाबा स्टाईल अंडा मसाला घरच्या घरी सर्व्हसाठी तयार होईल.