Shreya Maskar
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे.
देवगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्री मार्गांचे संरक्षण करण्यासाठी बांधला गेला होता.
असे बोले जाते की, देवगड किल्ल्याची बांधणी खडकाळ पर्वत कापून करण्यात आली आहे. त्यामुळे तो अत्यंत सुरक्षित मानला जातो.
देवगड किल्ल्यावरून समुद्रकिनाऱ्याचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करू शकता.
देवगड हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, कारण या आंब्यांची चव, सुगंध आणि उत्कृष्ट गुणवत्ता आहे.
देवगड हे कोकणातील सात दीपगृहांपैकी एक दीपगृह आहे. ज्यामुळे कोकणाची शोभा आणखी वाढते.
सुट्टीत कोकणात गेल्यावर तुम्ही लहान मुलांसोबत येथे आवर्जून या. मुलांना इतिहासाची उजळणी होईल. देवगड किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.