Shreya Maskar
त्वचा डिटॉक्स करणे म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली धूळ, अतिरिक्त तेल, मृत पेशी आणि मेकअपचे अवशेष काढून टाकून त्वचेला खोलवर स्वच्छ करणे होये. ही त्वचेला पुन्हा टवटवीत प्रक्रिया आहे, ज्यात क्लीन्झिंग, एक्सफोलिएशन आणि हायड्रेशनवर भर दिला जातो.
शरीराप्रमाणेच चेहऱ्याला डिटॉक्स करणे देखील महत्त्वाचे आहे. मुरुमे, ब्लॅकहेड्स, पिंपल्स आणि काळे डाग यांसारख्या समस्या टाळण्यासाठी घरी डिटॉक्स फेस मास्क बनवू चेहऱ्याला लावा. तुम्ही यासाठी फळांचा वापर करा.
स्ट्रॉबेरी फेस मास्क बनवण्यासाठी बाऊलमध्ये मॅश स्ट्रॉबेरी , दही, मध आणि लिंबाचा रस घालून पेस्ट मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील open pores साफ होतात आणि त्वचा उजळते.
केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी मध, ताजी क्रीम आणि मॅश केळी मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करते आणि त्वचेला मॉइश्चरायझ करते.
टोमॅटो फेस मास्क बनवण्यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये मध मिसळा. या पेस्टने मुरुमे आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.
द्राक्षाच्या रसात मैदा मिसळून तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील. तसेच हा फेस पॅक त्वचेला घट्ट देखील करतो.
यातील कोणताही एक फेस मास्क तुम्ही महिन्यातून ३-४ वेळा लावा. यामुळे त्वचा डिटॉक्स होते. लक्षात ठेवा, फेस मास्क फक्त १५-२० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.