Manasvi Choudhary
घरात लग्न असले की प्रत्येकालाच छान दिसायचे असते. यासाठी महिलांचा साज काही कमी नसतो.
साडीवर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही खालील 5 पॅटर्न्स निवडू शकता.
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्नामध्ये साडीचा लूक पूर्ण करण्यासाठी स्टायलिश ब्लाऊज असणे महत्वाचे आहे.
पारंपारिक साड्यांवर हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाऊज पॅटर्न सर्वात जास्त उठून दिसतो. यात कोपरपर्यंतच्या बाह्यांवर जरदोसी, मणी किंवा रेशमी धाग्यांचे वर्क केलेले असते. पैठणी साड्यांवर हे ब्लाऊज पॅटर्न उठून दिसते.
व्हि-नेक ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही शिफॉन साडी किंवा मॉडर्न लेहेंगा लूकवर ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकता.
बॅकलेस डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला दोरी डिझाईन ट्राय करू शकता त्त्यावर तुम्ही मोठे लटकन लावल्यास एक रॉयल लूक मिळतो.
जर तुम्हाला काहीतरी हटके ट्राय करायचे असेल, तर ब्लाऊजच्या हाताला 'फ्रिल्स' डिझाईन करा. ही डिझाइन सध्या खूप लोकप्रिय आहे.
पुढच्या बाजूला हाय नेक आणि पाठीमागच्या बाजूला नेट वापरून त्यावर नाजूक बुट्टी किंवा खडे लावलेले ब्लाऊज छान दिसतात.