Shreya Maskar
अक्कलकोट शहरातच वसलेले सिद्ध सरोवर हिरवाईने वेढलेले आहे. येथे संध्याकाळी तुम्ही निवांत फेरफटका मारण्यासाठी जा. थंड वातावरण अनुभवता येते.
अक्कलकोटला गेल्यावर सिद्धेश्वर मंदिरला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
सोलापूर येथे सिद्धेश्वर सरोवर आहे. अक्कलकोटपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेले हे सोलापूरमधील एक सुंदर ठिकाण आहे.
सोलापूरचा भुईकोट किल्ला हा १४ व्या शतकातील बहामनी राजवटीने बांधलेला एक अद्भुत ऐतिहासिक ठिकाण आहे. डोंगरावर नसून जमिनीवर (सपाट भूभागावर) बांधलेल्या मोजक्या किल्ल्यांपैकी एक म्हणून तो प्रसिद्ध आहे.
'कावा लेक व्ह्यू पॉइंट' हे लातूर एमआयडीसी मधील कावा रोडवर वसलेले एक शांत आणि वेगळेपण जपणारे पर्यटन स्थळ आहे. येथील शांत नैसर्गिक वातावरण आणि सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात उमटणारे सुंदर प्रतिबिंब यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याला 'जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते. हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत पसरलेले आहे.
अक्कलकोटपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे असलेली हिरवीगार शेती, मैदानी उपक्रम आणि ग्रामीण जीवनाचा पारंपरिक अनुभव मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.