Shruti Vilas Kadam
दात शिवशिवण्याचा त्रास होत असल्यास दातांसाठी तयार केलेली टूथपेस्ट वापरा. अशा टूथपेस्टमुळे दातांमधील संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते.
कडक ब्रशने किंवा जास्त दाब देऊन दात घासल्याने इनॅमलचा थर झिजू शकतो आणि हिरड्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मऊ ब्रिसल्स असलेला ब्रश वापरा.
थंड पाणी, आईस्क्रीम, गरम चहा किंवा कॉफी घेताना दातांमध्ये कळ येत असल्यास काही दिवस अशा पदार्थ नॉर्मल झाल्यावर प्या. कोमट पाणी पिणे आरामदायक ठरू शकते.
लिंबू, संत्री, सोडा आणि इतर आम्लयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने दातांवरील इनॅमल झिजण्याचा धोका वाढतो. असे पदार्थ खाल्ल्यानंतर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.
कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून चुळा भरल्याने दातातील झणझण्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा तरी हा उपाय करा
लवंग तेलाचा वापर दातदुखीसाठी जुना उपाय आहे. किंवा काही वेळा दाताखाली लवंग दाबून ठेवल्याने दातदुखणे थांबते. पण हा तात्पुरता उपाय आहे.
दात शिवशिवण्याचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागे दातांची कीड, तडा, हिरड्यांचे दुखणे असू शकते अशा वेळी डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या.
(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)