Dhanshri Shintre
मशरूम सूप स्वादिष्ट असून शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. हे बनवणे अगदी सोपे असून, ते आरोग्य आणि चवीसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
मशरूम सूप तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे कांदा, लसूण, दूध, बटर, मीठ आणि काळीमिरी, जे सूपला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनवतात.
मशरूम स्वच्छ धुऊन बारीक चिरा, तसेच कांदा आणि लसूणही बारिक चिरून सूपसाठी तयार ठेवा.
कढईत बटर गरम करून त्यात कांदा, लसूण आणि मशरूम घालून सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्या.
कांदा आणि मशरूम मऊ होऊ लागल्यावर त्यात थोडेसे दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत हळूहळू शिजवा.
चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पूड घालून गॅस बंद करा. नंतर थोडे पाणी टाकून मिश्रण ब्लेंडरने बारीक वाटून तयार करा.
मिश्रण तयार झाल्यावर ते सहा ते आठ मिनिटं मंद आचेवर शिजवा. यामुळे सूप अधिक चविष्ट होईल आणि सूप थोडे घट्ट होईल.
वरून कोथिंबीर, क्रीम आणि भाजलेल्या मशरूमच्या कापांनी सजवून हे सूप गरमागरम सर्व्ह करा, ज्यामुळे त्याचा स्वाद आणि आकर्षकता दोन्ही वाढेल.