Dehydration Symptoms: शरीरात पाणी कमी झाल्याचं कसं ओळखाल? ही ७ लक्षणे सांगतात तुमच्या आरोग्याची स्थिती

Shruti Vilas Kadam

सतत तहान लागणे आणि तोंड कोरडे पडणे

वारंवार तहान लागणे किंवा तोंड कोरडे वाटणे हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.

drink water | pinterest

गडद पिवळ्या रंगाची लघवी

लघवीचा रंग गडद होणे किंवा लघवी कमी होणे हे शरीरात पुरेसे पाणी नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

drink water | pinterest

डोकेदुखी आणि चक्कर येणे

शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो, त्यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते.

Drink Water | pinterest

अतिशय थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

पुरेसे पाणी न मिळाल्यास शरीराची ऊर्जा कमी होते आणि सतत थकवा जाणवू शकतो.

Drink Water | pinterest

त्वचा आणि ओठ कोरडे पडणे

त्वचा निस्तेज होणे, ओठ फुटणे किंवा कोरडे पडणे हीही डिहायड्रेशनची सामान्य लक्षणे आहेत.

Drink enough water | pinterest

स्नायूंमध्ये गोळे येणे

शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्याने स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात किंवा वेदना जाणवू शकतात.

Drink Water | pinterest

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

डिहायड्रेशनमुळे एकाग्रता कमी होणे, गोंधळल्यासारखे वाटणे आणि निर्णयक्षमता कमी होणे यांसारखे परिणाम दिसू शकतात.

Dehydration

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा चीजी आणि स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा; फक्त 15 मिनिटांत होईल तयार, वाचा रेसिपी

Bread Pizza Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा