Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा चीजी आणि स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा; फक्त 15 मिनिटांत होईल तयार, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

4 ब्रेड स्लाइस, 1/2 कप पिझ्झा सॉस, 1 कप मोझरेला चीज, 1/4 कप सिमला मिरची, 1/4 कप कांदा, 1/4 कप टोमॅटो (बिया काढून), स्वीट कॉर्न, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, बटर.

Bread Pizza Recipe

ब्रेडची तयारी करा

ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसला हलके बटर लावा. त्यावर समान प्रमाणात पिझ्झा सॉस पसरवा, जेणेकरून प्रत्येक घासाला छान चव येईल.

Bread Pizza Recipe | yandex

टॉपिंग्स घाला

ब्रेडवर कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि आवडीनुसार ऑलिव्ह किंवा मशरूम घाला. शेवटी भरपूर किसलेले चीज पसरवा.

pizza recipe | yandex

मसाले शिंपडा

चीजवर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चिमूटभर काळी मिरी पावडर शिंपडा. यामुळे पिझ्झाची चव आणखी वाढते.

Bread Pizza Recipe | yandex

पिझ्झा भाजून घ्या

तवा, ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये ब्रेड पिझ्झा 5 ते 8 मिनिटे शिजवा. चीज पूर्णपणे वितळेपर्यंत आणि ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

Bread Pizza Recipe | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार ब्रेड पिझ्झा तुकडे करून टोमॅटो सॉस, चिली सॉस किंवा चीज डिपसोबत गरमागरम सर्व्ह करा. हा नाश्ता, मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे.

Bread Pizza Recipe

'या' टिप्स फॉलो करा

ब्रेड पिझ्झा अधिक पौष्टिक बनवण्यासाठी पनीर, उकडलेला मका, गाजर, पालक किंवा मशरूम घालू शकता. अधिक कुरकुरीत चव हवी असल्यास ब्रेड आधी हलका टोस्ट करून घ्या.

Bread Pizza Recipe

Health Care: रोज रात्री उशिरा जेवण करता? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' ७ गंभीर परिणाम

Health Care | AI
येथे क्लिक करा