Sakshi Sunil Jadhav
सध्या उन्हाळा प्रचंड वाढत चालला आहे. त्यामुळे पाणी जास्त पिणं गरजेचं आहे.
बऱ्याच जणांना पाणी जास्त प्यायला आवडत नाही किंवा त्यांना तहान लागत नाही मग ते पाणी पिणं जास्त प्रमाणात टाळतात.
काहीवेळेस शरीराला पाण्याची गरज असते तेव्हा तुम्हाला ते काही संकेत देतं. चला जाणून घेऊयात.
तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुमचं डोकं दुखतं. कारण मेंदूला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही.
तुम्ही जेव्हा कमी पाणी पिता तेव्हा तुमचं तोंड नेहमीपेक्षा जास्त ड्राय होतं. ओठ सुकतात हे Dehydrationचं पहिलं लक्षण आहे.
उन्हाळ्यात सगळ्यात वाढती समस्या म्हणजे, डार्क रंगाची लघवी होणे. काहींना कमी वेळेस लघवीला दिवसातून १ ते २ वेळाच होतं. याचं कारण तुम्ही कमी पाणी सेवन करत आहात.
जेव्हा तुमची त्वचा कोरडी होते, तेव्हा तुम्ही कमी पाणी पिताय हे लक्षात घ्या. त्याने स्कीनचा ग्लो सुद्धा कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.