Death : अकाली मृत्यूचा धोका वाढवतात तुमच्याच रोजच्या 'या' ७ चुकीच्या सवयी, वेळीच व्हा सावध!

Shreya Maskar

अकाली मृत्यू

आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम करतात. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

Premature Death | pinterest

धूम्रपान- तंबाखूचे

सिगारेट, बिडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात आणि फुफ्फुसांचे आजार होण्याचा धोका वाढतो.

Smoking and Tobacco Use | pinterest

मद्यपान

अतिमद्यपानामुळे यकृताचे आजार, हृदयविकार, कर्करोग आणि अपघातांचा धोका वाढतो. मद्यपानामुळे मानसिक आरोग्यही बिघडते.

Alcohol | pinterest

अपुरी झोप

हेल्दी आरोग्यासाठी झोप खूपच महत्त्वाची असते. कमी झोप घेतल्याने रक्तदाब, चयापचय, मनःस्थिती बिघडते. दररोज साधारण ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.

Lack of Sleep | pinterest

तणाव

सततचा तणाव झोप, मानसिक आरोग्य आणि रक्तदाबावर परिणाम करतो. यामुळे माणूस एकटा राहायला लागतो . त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतात.

Stress | pinterest

जंक फूड

सतत जास्त मीठ, साखर, चरबीयुक्त आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते.मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

Junk Food | pinterest

शरीराची हालचाल नाही

तुम्ही रोज एकाच ठिकाणी जास्त वेळ बसत असाल, शरीराची हालचाल करत नसाल तर हे धोक्याचे आहे. नियमित व्यायाम होणे गरजेचे आहे. नाहीतर लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका वाढतो.

exercise | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : रात्री झोपेत अचानक पायात गोळा येतोय? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत

Night Leg Cramps | AI PHOTO
येथे क्लिक करा...