ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणूकीसाठी अर्ज दाखल करणार आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार बारामतीची निवडणूक लढवणार आहेत.
अजितदादांनंतर सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास वाचा.
सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत.
सुनेत्रा पवारांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्याने राजकारण आणि समाजकारणाचा वारसा तिथूनच मिळाला.
सुनेत्रा पवारांचा पर्यावरण विषयी त्यांचा महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. निसर्ग फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्यामध्ये त्यांना विशेष आवड आहे.
विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मध्यामतून सुनेत्रा पवार पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात होत्या. २०२४ मध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार राहिल्या आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्मंत्री झाल्या आहेत.सध्या सुनेत्रा वाहिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम करत आहेत.