ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे असते.
पुरेशी झोप न घेतल्याने तुम्हाला डोकेदुखी, मानसिक तणाव असा त्रास होऊ शकतो.
Afternoon Nap
अनेकजण दुपारीदेखील झोपतात. दुपारी झोपणे चांगले की वाईट याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
प्रत्येक व्यक्तीला ७-८ तासांची झोप पुरेशी असते.
दुपारी जेवल्यानंतर तुम्ही अर्धा तास झोपावे. जर तुम्ही जास्त वेळ झोपलात तर आरोग्याला हानी पोहचेल.
दुपारी ३ वाजल्यानंतर माणसाने झोपू नये. दुपारी झोपल्यावर रात्री झोप येत नाही.
दुपारी थोडा वेळ तुम्ही पॉवर नॅप घ्या. जेणेकरुन तुम्हाला फ्रेश वाटेल.
जर तुम्ही दुपारी जास्त वेळ झोपलात तर तुम्हाला रात्री झोप येत नाही. रात्री झोप न झाल्याने तुमची दिनक्रम बदलतो.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.