Siddhi Hande
सणासुदीला प्रत्येकाच्या घरात गोडाचा पदार्थ बनतो. तुम्ही घरीच बाजारात मिळणारे श्रीखंड बनवू शकतात.
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही घरात दही लावा. त्यानंतर दही सुती कपड्यात बांधा. दह्यातील पाणी निघू जाईपर्यंत ते बांधून ठेवा.
रात्रभर हे दही बांधून ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातील सर्व पाणी निघून जाईल. मस्त चक्का तयार झालेला असेल.
यानंतर एका बाऊलमध्ये चक्का काढून ठेवा. त्यात पिठी साखर टाका.
हे मिश्रण पिठी साखर व्यवस्थिक विरघळेपर्यंत छान फेटून घ्या. यानंतर त्यात वेलची, जायफळ पावडर आणि केशर टाका.
यानंतर तयार झालेले मिश्रण सुती कापड्यातून बाऊलमध्ये काढा.
यानंतर श्रीखंडावर काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स टाका.