Dasara 2026 : दसऱ्याच्या सणाचा गोडवा वाढवा, पहिल्याच प्रयत्नात 'पुरणपोळी' बनेल मऊ अन् स्वादिष्ट

Shreya Maskar

दसरा

दसऱ्याच्या सणाला महाराष्ट्रात पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे. गोड पुरण आणि मऊसूत पोळी सणाचा गोडवा वाढवते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवण्याची रेसिपी पाहा.

Dussehra | pinterest

पुरणपोळी

पुरणपोळी बनवण्यासाठी चणाडाळ, गूळ, वेलची पूड, जायफळ पूड, तूप, गव्हाचे पीठ, मैद्याचे पीठ, मीठ, तेल, तूप आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Puranpoli | pinterest

चणा डाळ

पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुऊन ३० मिनिटे भिजवा. त्यानंतर कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. डाळीतील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

dal | yandex

वेलची पूड

शिजवलेली डाळ आणि गूळ एका पातेल्यात एकत्र गरम करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण पुरणयंत्रात एकजीव करा.

cardamom | pinterest

मैदा

एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ कणीक मळा. झाकून २०–३० मिनिटे ठेवा.

flour | pinterest

पुरण भरून पोळी लाटा

कणकेचा गोळा घेऊन त्याची छोटी पारी करा. त्यात पुरणाचा गोळा भरून कडा बंद करा आणि थोडे पीठ लावून अलगद गोल पोळी लाटा.

Puranpoli | pinterest

तूप

गरम तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी भाजा. गोल्डन फ्राय झाल्यावर तूप लावा. अशाप्रकार गरमागरम पुरणपोळी तयार झाली.

Ghee | pinterest

टिप

पुरणातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे आटवून घ्या. कणीक मऊ आणि लवचिक मळा. पोळी लाटताना जास्त दाब देऊ नका. पुरण आणि कणकेचे गोळे साधारण योग्य प्रमाणात घ्या, म्हणजे पोळी लाटताना फाटणार नाही.

Tip | pinterest

NEXT : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

Upvasachi Lassi Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...