Shruti Vilas Kadam
अल्कोहोल आणि केमिकलयुक्त डिओडोरंट्समुळे अंडरआर्म्सच्या त्वचेवर इरिटेशन होते आणि ती काळवंडते. त्यामुळे अल्कोहोल-फ्री आणि नैसर्गिक घटकांवर आधारित रोल-ऑन वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
ड्राय शेविंग किंवा जुन्या रेजरने शेव केल्यास त्वचेवर सूज, कट्स आणि इन्फ्लेमेशन होते. त्यामुळे नेहमी शेविंग क्रीम किंवा जेल वापरून आणि स्वच्छ रेजरनेच शेव करावी.
टाइट कपडे किंवा सतत घर्षण झाल्यामुळे अंडरआर्म्सचा रंग गडद होतो. त्यामुळे कॉटन आणि सैल कपडे परिधान करावेत आणि त्वचेला श्वास घेऊ द्यावा.
आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने लॅक्टिक अॅसिड किंवा मैंडलिक अॅसिडयुक्त स्क्रब वापरावा. यामुळे मृत त्वचा निघते आणि त्वचा उजळते.
बटाट्याचा रस, लिंबाचा रस, अॅलोवेरा जेल आणि नारळ तेल हे नैसर्गिक उपाय त्वचा उजळविण्यास मदत करतात. मात्र हे वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
अंडरआर्म्सला कोरडे ठेवू नका. दररोज मॉइश्चरायझर किंवा व्हिटॅमिन ई ऑइल वापरल्यास त्वचा मऊ राहते आणि काळेपणा कमी होतो.
जास्त पिगमेंटेशन, इन्फेक्शन किंवा हार्मोनल बदलांमुळे अंडरआर्म्स डार्क होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. क्लिनिकल ट्रीटमेंट्स जसे केमिकल पील्स किंवा लेझर यानेही फायदा होऊ शकतो.