Shruti Kadam
थंडगार बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्यावर लावून डोळ्यांवर ठेवा. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि ब्लीचिंग गुणधर्म त्वचेला उजळतात.
कोरफडीचा ताजा गर डोळ्याखाली लावल्याने त्वचेचं पोषण होतं आणि थकवा कमी होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी वापरा.
बदाम तेलामध्ये जीवनसत्त्व ‘E’ असते. सौम्य हाताने डोळ्यांखाली मसाज केल्यास काळसरपणा हळूहळू कमी होतो.
वापरलेल्या आणि फ्रिजमध्ये थंड केलेल्या टी बॅग्स १०-१५ मिनिटं डोळ्यांवर ठेवा. यात टॅनिन्स असतात जे डार्क सर्कल्स कमी करतात.
थंडगार काकडीचे गोल चकत्या डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवती थंडावा मिळतो आणि त्वचेला उजळपणा मिळतो.
एक चमचा थंड दूध आणि थोडीशी हळद मिसळून डोळ्यांखाली लावल्यास त्वचेचा रंग निखरतो.
डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर पुरेशी झोप (७–८ तास) आणि दररोज किमान ८–१० ग्लास पाणी पिणं अत्यावश्यक आहे.