Dark Circles: झोप पूर्ण होऊनही डोळ्यांखाली डार्क सर्कल आहेत? डॉक्टरांनी सांगितली ही ७ छुपी कारण

Shruti Vilas Kadam

आनुवंशिकता (Genetics)

काही लोकांमध्ये डार्क सर्कल्सची समस्या आनुवंशिक असते. कुटुंबातील इतर सदस्यांनाही ही समस्या असल्यास ती तुमच्यातही दिसू शकते.

Dark Circles Home Remedy

वाढते वय

वय वाढल्यानंतर त्वचेतील कोलेजन आणि चरबी कमी होऊ लागते. त्यामुळे डोळ्यांखालील त्वचा पातळ दिसते आणि रक्तवाहिन्या अधिक स्पष्टपणे दिसू लागतात.

Dark Circles Remedy | Saam tv

शरीरातील पाण्याची कमतरता

पुरेसे पाणी न पिल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे अधिक ठळक दिसतात.

Remedy to Remove Dark Circles

अॅलर्जी आणि सायनसचा त्रास

अॅलर्जी किंवा सायनसच्या समस्येमुळे डोळ्यांभोवतीच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे डार्क सर्कल्स निर्माण होऊ शकतात.

Dark Circles Remedy | Saam tv

स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर दीर्घकाळ बसल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांभोवतीचा भाग काळवंडलेला दिसू शकतो.

Dark Circles Remedy | Saam Tv

पोषणतत्त्वांची कमतरता

लोह, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन K किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू शकतात.

Dark Circles Remedy | Saam Tv

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाशामुळे त्वचेत मेलेनिनचे उत्पादन वाढते. त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा अधिक गडद दिसू शकते.

Dark Circles Remedy | Saam Tv

BP Reading Problem: तुम्ही घरी रक्तदाब तपासता का? या 7 चुकांमुळे रक्तदाबाची रीडिंग येऊ शकते जास्त

BP Reading Problem | pinterest
येथे क्लिक करा