Shruti Vilas Kadam
कॅफिनयुक्त पेये घेतल्यानंतर रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. त्यामुळे बीपी मोजण्यापूर्वी किमान 30 मिनिटे चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स टाळा.
रक्तदाब मोजताना बोलणे, हसणे किंवा शरीराची हालचाल केल्यास रीडिंगवर परिणाम होऊ शकतो.
पाठ खुर्चीला टेकलेली नसणे, पाय क्रॉस करून बसणे किंवा हात योग्य उंचीवर न ठेवणे यामुळे चुकीची रीडिंग येऊ शकते.
लघवीला जाण्याची घाई असेल तर रक्तदाब वाढलेला दिसू शकतो. त्यामुळे बीपी मोजण्यापूर्वी शौचालयाचा वापर करणे चांगले.
रक्तदाब मोजणाऱ्या मशीनचा कफ खूप सैल किंवा खूप घट्ट असल्यास रीडिंग अचूक येत नाही.
चालणे, जिने चढणे किंवा व्यायाम केल्यानंतर रक्तदाब काही काळ वाढलेला असू शकतो. त्यामुळे विश्रांती घेतल्यानंतरच बीपी तपासा.
रक्तदाब दिवसातून अनेक वेळा बदलू शकतो. त्यामुळे 1-2 मिनिटांच्या अंतराने दोन किंवा तीन रीडिंग घेऊन त्याची सरासरी पाहणे अधिक योग्य ठरते.