Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात थंडी, कोरडी हवा आणि सतत लाळ लागणं यामुळे ओठांभोवतीचा त्वचेचा रंग काळसर दिसू लागतो. हा काळेपणा दिसायला त्रासदायक वाटतो, पण घरच्या सोप्या स्क्रबने तो कमी करता येतो.
नैसर्गिक घटक त्वचा हलक्या हाताने एक्सफोलिएट करून डेड स्किन काढून टाकतात आणि त्वचा उजळ व मऊ बनवतात. असे काही स्क्रब आहेत नियमित वापरल्यास फरक स्पष्ट जाणवू लागतो.
साखर त्वचेवरील डेड स्किन सहज काढते आणि मध त्वचेला पोषण देतो. हा स्क्रब १-२ मिनिटे हलक्या हाताने चोळून धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरल्यास काळेपणा कमी होतो.
ओट्स हा नैसर्गिक एक्सफोलिएटर असून दही त्वचा उजळवण्यास मदत करते. दोन्ही मिसळून पेस्ट करून ओठांभोवती मसाज करा. हा स्क्रब त्वचेला मऊ, तजेलदार आणि उजळ बनवतो.
कॉफी रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा घट्ट व उजळ दिसते. नारळ तेलामुळे त्वचा खोलवर मॉइश्चराइज होते. २ मिनिटे हलका मसाज केल्यास काळेपणा कमी होऊ लागतो.
बेसन त्वचा स्वच्छ करतं, हळद नैसर्गिक उजळपणा देते आणि गुलाबपाणी त्वचा थंड ठेवचे. हा पेस्टसारखा स्क्रब ओठांभोवती ३-४ मिनिटे लावून हलकेच चोळा.
लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि साखर एक्सफोलिएशन करते. पण त्वचेला हा उपाय दररोज वापरू नये. १ मिनिटाचा मसाज काळेपणा कमी करण्यास मदत करतो.
तांदळाचं पीठ त्वचा उजळवतं आणि दूध त्वचेची मृदुता वाढवतं. हा स्क्रब ओठांभोवतीची कडक व काळी झालेली त्वचा नरम करतो. आठवड्यातून २-३ वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसतात.