Dalgona Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी झटपट बनवा कॅफेसारखी फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ चमचे इन्स्टंट कॉफी, २ चमचे साखर, २ चमचे गरम पाणी, १ ग्लास थंड दूध आणि आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे घ्या.

Dalgona Coffee Recipe

कॉफीचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात इन्स्टंट कॉफी, साखर आणि गरम पाणी घाला. तिन्ही घटक एकत्र होईपर्यंत चमच्याने किंवा व्हिस्कने व्यवस्थित मिसळा.

Dalgona Coffee Recipe

कॉफीचा फेस तयार करा

मिश्रणाला हँड व्हिस्क किंवा इलेक्ट्रिक बीटरने फेटा. काही मिनिटांत त्याचा रंग हलका होऊन घट्ट आणि फेसाळ क्रीम तयार होईल. चमच्याने फेटल्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो.

Dalgona Coffee Recipe

ग्लासमध्ये थंड दूध घाला

एका उंच ग्लासमध्ये थंड दूध घ्या. थंड कॉफी हवी असल्यास त्यात काही बर्फाचे तुकडे घाला. दूध पूर्णपणे भरू नका, जेणेकरून वर कॉफीचा फेस घालण्यासाठी जागा राहील.

Dalgona Coffee Recipe

दुधावर कॉफीचा फेस घाला

तयार केलेला घट्ट कॉफीचा फेस चमच्याच्या मदतीने दुधावर अलगद पसरवा. त्यामुळे कॉफीला आकर्षक कॅफे-स्टाइल लूक मिळेल.

Dalgona Coffee Recipe

कॉफी सजवून घ्या

कॉफीच्या फेसवर थोडी कॉफी पावडर किंवा कोको पावडर भुरभुरा. यामुळे कॉफी दिसायला सुंदर आणि आकर्षक होते.

Dalgona Coffee Recipe

थंडगार डालगोना कॉफी सर्व्ह करा

तुमची फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी तयार आहे! पिण्यापूर्वी कॉफीचा फेस दुधात मिसळा. कुकीज किंवा बिस्किटांसोबत या कॉफीचा आस्वाद घेऊ शकता.

Dalgona Coffee Recipe

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा