Shreya Maskar
डाळवडा बनवण्यासाठी मुगाची डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, खोबऱ्याचे तुकडे, कांदा, मीठ, तेल, रवा, लाल तिखट, हळद आणि आलं-लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.
डाळवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ, मुगाची डाळ पाण्यात ५ ते ६ तास भिजवा. जेणेकरून त्याचे पीठ चांगले बनेल.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, कढीपत्ता, खोबऱ्याचे तुकडे, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून जाडसर पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
तयार मिश्रणात लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करा आणि १० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर मिश्रणात बारीक रवा आणि हिरवीगार कोथिंबीर टाकून वड्याचे पीठ एकजीव करा. तुम्ही यात ओवा देखील थोडा टाकू शकता. जेणेकरून पोटाला त्रास होणार नाही.
आता पीठाचे छोटे गोळे करून प्लास्टिक पेपरला तेल लावून त्यावर गोलाकार थापून घ्या. असे वडे पटापट थापले जातात.
गरम तेलात डाळवडे व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. वडे फ्राय करताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून ते जळणार नाही.
गरमागरम सांबार किंवा चटणीसोबत डाळवड्याचा आस्वाद घ्या. हा नाश्ता तुम्ही सकाळी डब्याला घेऊ जाऊ शकता. तसेच संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता.