Shreya Maskar
आवळा कँडी खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते. तसेच चॉकलेटसाठी हा उत्तम पर्याय आहे.
आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या. जास्त कच्चे आवळे घेऊ नका. हा पदार्थ तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता.
एका बाऊलमध्ये पाणी गरम करून त्यावर आवळ्यांनी भरलेली चाळणी ठेवा. १०-१५ मिनिटे आवळे वाफवून घ्या.
आवळे थंड झाल्यावर त्यातील बिया काढून टाका. त्यानंतर चांगले मॅश करून घ्या.
एका पॅनमध्ये बडीशेप, मेथी, मोहरी, धने-जिरे भाजून घ्या. हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर बनवून घ्या.
एका मोठ्या भांड्यात मॅश आवळे, ठेचलेला लसूण, भाजलेला मसाला, मीठ, हळद आणि तिखट घालून चांगले मिक्स करा.
त्यानंतर यात तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ घालून आवळा कँडी सेट होण्यासाठी चॉकलेट ट्रे मध्ये टाका. अशाप्रकारे आंबट-गोड आवळा कँडी तयार झाल्या आहेत.
आवळा कँडीमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्ही हा पदार्थ आवर्जून घरी बनवा.