Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shreya Maskar

डाळ ढोकळी

डाळ ढोकळी हा प्रामुख्याने गुजराती आणि राजस्थानी खाद्यसंस्कृतीत लोकप्रिय पदार्थ आहे. डाळ ढोकळीला विविध नावाने ओळखले जाते. यात वरणफळ, चकोल्या, दाल पिठी अशा नावांचा समावेश आहे.

Dal dhokali | pinterest

साहित्य

डाळ ढोकळी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन, सेलरी सीड्स, हळद , लाल तिखट, तेल, मीठ, तूर डाळ, टोमॅटो, आले-हिरवी मिरची पेस्ट, चिंचेचा गर किंवा लिंबाचा रस, गूळ,मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, लवंग आणि दालचिनी इत्यादी साहित्य लागते.

Material | pinterest

गव्हाचे पीठ

डाळ ढोकळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, सेलरी सीड्स, हळद, लाल तिखट, मीठ आणि तेल घालून मिक्स करा. पाणी घालून थोडे घट्ट पीठ मळून घ्या आणि झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा.

wheat flour | pinterest

ढोकळीचा आकार

त्यानंतर पिठाच्या पातळ पोळ्या लाटा. चाकूने काजूच्या कतलीच्या किंवा हिऱ्याच्या आकाराच्या तुकड्यांमध्ये कापा.

shaped | pinterest

डाळ

डाळ बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि अख्खे मसाले घालून फोडणी द्या. टोमॅटो आणि आले-मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.

dal | pinterest

चिंचेचे पाणी

भाजलेल्या मसाल्यांमध्ये उकडलेली डाळ, हळद, मिरची, मीठ, गूळ, चिंचेचे पाणी आणि सुमारे २ कप पाणी घालून उकळी आणा.

Tamarind water | pinterest

चकोल्या

डाळ उकळत असताना, चिरलेले ढोकळीचे तुकडे एक एक करून घाला. झाकण ठेवून मंद आचेवर १२-१५ मिनिटे शिजू द्या, जेणेकरून ढोकळी मऊ होऊन घट्ट होईल.

Chakolya | pinterest

कोथिंबीर

शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा. लक्षात ठेवा, चकोल्या थंड डाळीत घातल्यास ढोकळी चिकटेल.

Coriander | pinterest

NEXT : गरमागरम भात अन् चटपटीत 'मेतकूट'; पावसाळ्यात करा अस्सल गावरान बेत, वाचा अगदी सोपी रेसिपी

Metkut recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...