Rashi Bhavishya : रविवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशी भविष्य

Anjali Potdar

मेष

आज काही साहसी आणि धाडसी निर्णय मनात येतील. आपल्या धर्माची धुरा पुढे न्याल. दिवस आनंदात जाईल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा अडचणीचा ठरू शकतो. मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. मनासारख्या घटना घडतील. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील.

मिथून राशी | Saam TV

कर्क

आज तुमच्या मनाला हळवेपण येऊ शकतं. त्यामुळे जास्त विचार करू नका. मनास्ताप टाळा आणि तब्येतीची काळजी घ्या.

कर्क राशी | Saam TV

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदात जाईल. स्वत:बरोबर तुम्ही इतरांनाही आनंदीत ठेवाल. पैशांशी निगडित व्यवहार होतील. संतती सौख्य लाभेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज तुम्ही नवीन वाट शोधाल. त्याचे तुम्हाला समाधान लाभेल. फक्त द्विधा मनस्थिती ठेवू नका.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांच्या आज मनासारख्या घटना घडतील. पैशांची आवक-जावक चांगली राहील. प्रवासाचा योग येईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज कुटुंबियाची काळजी घ्या. विनाकारण घरामध्ये दहशत आणू नका. वातावरण हलके फुलके ठेवा. सर्वांसोबत मिळून मिसळून वागा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

तुमची रास गुरुच्या अंमलाखाली असल्याने आज तुमच्यामधील गुण वाढीस लागणार आहेत. कोणत्याही गोष्टीत समाधान मानाल. इतरांची काळजी घ्याल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज खर्चामुळे तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. पैसा खर्च केल्यामुळे मनस्ताप वाढेल. काही घटना या बंधनकारक ठरतील आणि हे योग टाळावेत.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

तुमची रास संशोधनात्मक असल्यामुळे आज भेटीगाठी वाढतील. इतरांच्या ओळखीतून आपल्याला मोठा फायदा होईल. अनेक लाभ होतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आपली रास देवभोळी असल्याने आज तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. समाधानाचा नक्की मार्ग मिळेल. फक्त साधेपणा जपून ठेवा.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : ब्लॅक आऊटफिटमध्ये कमल हसनच्या लेकीचा स्टायलिश अंदाज; पाहा फॅन्सी लूक...

Shruti Haasan Look